Nashik | नाशकात कृषीमंत्र्यांनी धरला तीन पावली नृत्यावर ठेका | Sakal |
श्री पेंढारी शैक्षणिक आणि सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं सामुदायिक विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यात २३ जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. यानिमित्त कृषिमंत्री दादा भुसे या सामुदायिक विवाह सोहळ्यातील पारंपारिक मांडव कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी समाज बांधवासोबत ढोल-ताशांच्या गजरात तीन पावली नृत्यदेखील केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
#Sakal #Nashik #DadaBhuse #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #maharashtranews